सोलापुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक 19 एप्रिलला; मध्यवर्ती मंडळाचा निर्णय
सोलापूर शहरात जुन्या परंपरेनुसार सर्वांना सोयीची अशी
रविवारीच १९ एप्रिल रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय विविध मंडळाच्या भीमसैनिकांनी
घेतला आहे. कितीही मध्यवर्ती महामंडळ असली तरी एकाच दिवशी मिरवणूक काढण्यात यावी.
समाजात दुफळी निर्माण न होता परंपरा कायम राहिली पाहिजे. याला बोधिसत्व डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचा याला पाठिंबा असल्याची माहिती विश्वस्त
समितीचे अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भीम जयंती
मिरवणूक ही सर्वांच्या सोयीसाठी रविवारीच काढण्याची जुनी परंपरा कायम आहे. १४
एप्रिलनंतर येणार्या पहिल्या रविवारी हे मिरवणूक काढली जाते. इतर राज्यातून
रविवारी सर्व भीमसैनिक या मिरवणुकीत येतात. सुट्टी असल्याने कोणतीही गैरसोय होत
नाही. कितीही मध्यवर्ती महामंडळ असली तरी रविवारी एकाच दिवशी मिरवणूक काढणे
सर्वांच्या सोयीसाठी आवश्यक आहे. आमचा कुणाला विरोध नाही. सोलापुरात एकच मिरवणूक
निघावी. ही लोकभावना आहे.
रविवारी
मिरवणूक असल्याने तमाम भीमसैनिक व भीमप्रेमी रेल्वे, एसटीचे रिझर्वेशन करतात. मोठे नियोजन
केले जाते. दोन महिन्यापासून मंडळे जय्यत तयारी करतात. साऊंड बुकिंगही केली जाते
अशा परिस्थितीत अचानक मिरवणुकीची तारीख बदलल्याने संभ्रम निर्माण होईल. भीम जयंती
ही एका नेत्याच्या पक्षाच्या किंवा एखाद्या घटकाच्या मनावर नसून ही सर्व समाजाला
सोयीस्कर होईल अशीच साजरी व्हावी. मिरवणूक ही ट्रायल करण्यासारखी गोष्ट नाही.
यामुळे जुन्या परंपरेनुसारच रविवारी रोजी मिरवणूक काढावी असा निर्णय विविध उत्सव
मंडळाच्या भीमसैनिकांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आवाजाची
मर्यादा ठेवून रविवारची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरम्यान, १९ रोजी काढण्यात येणार्या मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी सर्व
भीमसैनिकांची बैठक शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता न्यू बुधवार
पेठ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी विविध मंडळाच्या भीमसनिकांनी उपस्थित राहावे, असे
आवाहन केले आहे.
या पत्रकार
परिषदेस आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, विकी
शेंडगे, पिंटू डावरे, सागर उबाळे,
सिद्धेश्वर पांडगळे, अजित बनसोडे, नागेश इंगळे, सुहास सावंत, जयप्रकाश
भंडारे, आयाज दिना, अजित गादेकर,
आशुतोष नाटकर, बाळासाहेब बनसोडे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव आदी उपस्थित होते .