सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी IAS एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती

सोलापूर: सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण आणि अभ्यासू प्रशासक म्हणून ओळख असलेले एस. कार्तिकेयन लवकरच आपला पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नवा वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मूळचे तामिळनाडू राज्याचे असलेले एस. कार्तिकेयन हे २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.कॉम (अकाउंटन्सी) पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, अमराठी असूनही त्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व आहे, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात काम करताना मोठी मदत होत आहे.एस. कार्तिकेयन यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करून आपली ठसा उमटवला आहे यवतमाळ येथे त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (SDO) म्हणून काम पाहिले आहे. नांदेड येथे प्रकल्प अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प) म्हणून त्यांनी आदिवासी भागातील विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डात सहाय्यक सचिव स्तरावर काम करण्याचा अनुभव घेतला आहे. आपल्या प्रशिक्षण काळात त्यांनी महसूल प्रशासन आणि जमीन व्यवस्थापनाबाबत सखोल अनुभव घेतला आहे.