सोलापूर महापालिकेच्या बजेट सभेत गोंधळ; नगरसेवकांमध्ये वादामुळे वातावरण तापले

सोलापूर : सोलापूर महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या बजेट सभेदरम्यान गोंधळ आणि वादाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सभागृहात शहरातील विविध प्रश्न मांडताना नगरसेवक अमोल शिंदे यांना भाजपच्या नगरसेवकांकडून वारंवार थांबवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या अमोल शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहातच हमरीतुमरीवर वाद घातला. काही काळासाठी सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर वाद निवळल्यानंतर सभेला पुन्हा सुरुवात करण्यात आली. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.