आध जगद्गुरु श्री देवरसाम्राज्य जन्मोत्सव सोहळा उत्साहात; महापौर विनायक कोंड्याल यांची उपस्थिती

सोलापूर : आशा नगर व सम्राट नगर परिसरात आयोजित आध जगद्गुरु श्री देवरसाम्राज्य जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास सोलापूरचे महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. श्री देवरसाम्राज्य हटगार कोष्टी समाज पंचकमिटी, जन्मोत्सव समिती आणि समस्त भक्त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विविध उपक्रमांनी रंगला उत्सव

या जन्मोत्सवानिमित्त

  • पुराण प्रवचन
  • भव्य रक्तदान शिबिर
  • कुंकुमार्चन सोहळा
  • श्रींचा पाळणा (जन्मोत्सव)
  • दीपोत्सव
  • भव्य मिरवणूक

अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी यात सहभाग घेतला. विकासाच्या घोषणा महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “प्रभागातील नागरिकांसाठी सुसज्ज हॉस्पिटल आणि विरंगुळ्यासाठी बागेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर करण्यात येणार आहे.” तसेच अशा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लागतो, असे त्यांनी नमूद केले. मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेविका अर्चना वडनाल, सारिका खजूरगी, तसेच महादेव जुळजुळे, गुरुनाथ प्याटी, राजू श्रीगण, निलेश आळगूंडगे, महेश अक्का, विरेश आंबलगी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.