युझवेंद्रच्या पत्नीने मागितली तब्बल ६० कोटींची पोटगी ?
.jpeg)
मुंबई, :- सध्या क्रिकेट जगतातील क्रीडाप्रेमींमध्ये टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता धनश्रीने युझवेंद्रकडे घटस्फोटाची पोटगी ६० कोटी रुपये मागितली असल्याची चर्चा पुढे येत आहे. परंतु युझवेंद्रने मात्र या मागणीला नकार दिला आहे. धनश्री आणि युझवेंद्र दोघांनी एकमेकांना सोशल मीडिया अनफॉलो केले आहे. धनश्री वर्मा हिला एक तेलुगू चित्रपट मिळाला असून ती त्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. युझवेंद्र आणि धनश्री हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नाही आहेत. त्यामुळे या दोघांच्या नात्यावर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. दरम्यान, युझवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा हिचा एक व्हिडिओही समाजमाध्यमावर व्हायरल झाला. धनश्रीने केवळ प्रसिध्दी मिळवण्यासाठी युझवेंद्रसोबत लग्न केल्याचाही आरोप सातत्याने तिच्यावर होत आहे. यानंतर धनश्रीने सोशल मीडिया अकाउंटवरून या सगळ्या चर्चेवर संताप व्यक्त केला आहे.