पत्नी व मुलाची हत्याकरून तरुणाने जीवन संपवले; ऑनलाईन जुगारात कर्ज झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

धाराशिव: पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष पाजून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धाराशिव तालुक्यातील बावी येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच  गावात पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह पोलिस यंत्रणा दाखल झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार ऑनलाइन रम्मीच्या खेळात पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नसून पोलिस तपास सुरू आहे. लक्ष्मण मारुती जाधव, असे आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी (21) यांच्याशी प्रेम विवाह केला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता.