राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ; विरोधी पक्ष नेते पदाचा मुद्दा ऐरणीवर

नागपूर: उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने विधानसभेच्या सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली. वंदे मातरम् गीताला सात नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त वंदे मातरम् संपूर्ण गीताचे सभागृहात पुन्हा गायन करण्यात आले. मात्र, यंदा विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार आहे. त्यामुळे गुरुजी पक्षनेतेपदाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी महायुती ला प्रचंड बहुमत मिळणे दुसरीकडे विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. विरोधी पक्षनेता नसला तरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील वाढते अत्याचार आणि तरुणांच्या हाताला नसलेला रोजगार या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर शासकीय कामकाज आटोपून शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर दिसणार का आणि सरकार जनतेला खूश करण्यासाठी काही नवीन घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भास्कर जाधव हे आक्रमक नेते आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेचा त्यांना दांगडा अनुभव आहे. अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी ठाकरे गटाने फक्त त्यांना विरोधीपक्ष नेता करावे, असे पत्र देऊन ठेवले आहे. पण जेव्हा खरी वेळ येईल, त्यावेळी त्यांना करतील, असे वाटत नाही, असे ठाकरे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ती वेळ पडल्यास माझे घेणे किंवा नाही ही नंतर पाहता येईल. पण सरकारने आधी स्वतःचे काम करावे. विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचा कार्यक्रम लावावा. त्यामुळे उद्धव ठाकरे माझे नाव घेतील किंवा अन्य कणाचे नाव घेतील, तो आमचा प्रश्न असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. एकूणच विरोधी पक्षनेता कोणीही असो सरकारनं विरोधी पक्षनेते पदाचा कार्यक्रम जाहीर करावा असा आग्रहही जाधव यांनी केला.