कोल्हापुराची माधुरी हत्तीण वनतारा पुन्हा येणार?

नांदणी मठात ३ दशकांपासून राहणारी ३६ वर्षीय हत्तीण महादेवी उर्फ माधुरी हिला गुजरातमधील वनतारा प्राणी कल्याण केंद्रात हलवण्यात आलं. मध्यरात्री पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण झाली. माधुरीच्या निरोपावेळी गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. पेटा इंडियाने तिच्या आरोग्याबाबत तक्रार दाखल केली होती – ज्यात फूट रॉट, वाढलेली नखे आणि मानसिक तणावासारख्या समस्या नमूद केल्या होत्या. यावर आधारित HPC समितीने हस्तांतरण शिफारस केली. मुंबई उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टाने मठाची याचिका फेटाळली. ग्रामस्थांची प्रतिक्रिया व चळवळ या निर्णयाविरोधात नांदणी, कोल्हापूर व परिसरात संतापाचा सूर आहे. सतेज पाटील व राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १.२५ लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. २ ऑगस्टला हे फॉर्म राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींनी अंबानी व वनताराविरोधात ठराव मंजूर केले आहेत. वनताराचे प्रतिनिधी नांदणीत येणार? वनताराचे सीईओ विहान करणी आणि त्यांची टीम नांदणी मठातील स्वामीजींची भेट घेणार असल्याचं कळतं. ही भेट चर्चेसाठी की निर्णयासाठी यावर चर्चा सुरू आहे. अंबानीविरोधात लोकशक्ती? गावकऱ्यांनी जिओ सिम पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वनतारा व रिलायन्सविरोधातील जनमत अधिक तीव्र होत आहे.