भाजप कोकणात देणार ठाकरे गटाला धक्का ?

याबाबत घोडेले यांची वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली असून कमिटमेंट मिळताच नंदकुमार घोडेले मुंबई येथे जाऊन पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोडेले यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे सेनेला एक मोठा धक्का बसू शकतो. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक नगरसेवक हे शिंदेंची शिवसेना किंवा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशातच आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना माजी महापौर व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नंदकुमार घोडेले हे देखील शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते. घोडेले यांनी या संदर्भात शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली असल्याची देखील माहिती आहे. शब्द मिळण्यासाठी नंदकुमार घोडेले थांबलेले असून तो मिळताच मुंबईला जाऊन ते पक्ष प्रवेश करणार आहेत. घोडेले यांना शिंदे सेनेत पक्ष संघटनेचे महत्त्वाचे पद त्याशिवाय मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. घोडेले हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी महापौर छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू नंदकुमार घोडेले हे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची शक्यता आहे. नंदकुमार घोडेले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देखील राहिले आहेत. तर त्यांच्या पत्नी अनिता घोडेले या देखील महापौर राहिल्या आहेत. घोडेले हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर भारतीय जनता पार्टीनं पक्ष विस्ताराचा प्लॅन आखलाय. राज्यात भाजपकडून सदस्य नोंदणीचे मोठे अभियान राबवले जात आहे. माजीमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षाच्या संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने विस्ताराची योजना आखली आहे. भाजपच्या या पक्ष विस्ताराचा पहिला धक्का शिवसेना ठाकरे पक्षाला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील बडे नेते आणि माजी आमदार राजन साळवी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. साळवी याच महिन्यात ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. साळवी हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते मानले जातात. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आजपर्यंत साळवी यांनी ठाकरेंना भक्कम साथ दिली आहे. ते २००९ पासून तीन वेळा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सामंत यांनी साळवी यांचा पराभव केला. या निवडणुकीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी मदत केली नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे. त्यांचे राऊत यांच्याशी वितुष्ट निर्माण झाले असून त्यामधूनच ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजन साळवी आणि किरण सामंत हे एकाच मतदारसंघातील थेट प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे शिवसेनेत जाण्याऐवजी भाजपकडं जाण्याचा मार्ग साळवी स्वीकारण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जुने नेते असलेल्या साळवींना पक्षात घेऊन या जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या विस्ताराला शह देण्याचा भाजपचा प्लॅन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे