भाजपला महिला अध्यक्ष मिळणार? ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह तिघे चर्चेत

नवीदिल्ली : भारतीय जनता पक्षाने
नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेवर विचार सुरू केला आहे. यावेळी पक्ष एका
मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप
पहिल्यांदाच एका महिलेकडे पक्षाची सूत्रे सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये
पक्षाची कामगिरी चांगली होती. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणूनही एका महिलेला
काम देण्यात आले. आता महिलांना आकर्षित करण्यासाठी एका महिलेलाही पक्षाध्यक्ष
बनवण्याचा हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात येत आहे.सध्याचे पक्षाध्यक्ष जेपी
नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपला होता, परंतु
पक्षाने त्यांना जून २०२४ पर्यंत अधिक जबाबदारी दिली. आता लवकरच नवीन नाव जाहीर
केले जाऊ शकते. पुढील पक्षाध्यक्ष महिला असू शकते. यासाठी तीन नावे आघाडीवर आहेत.
निर्मला सीतारमण, डी. पुरंदेश्वरी आणि वनती श्रीनिवासन
यापैकी कोणाचेही नाव मंजूर केले जाऊ शकते.सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण
यांनी पक्षात खूप मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांना केंद्र सरकारमध्ये काम
करण्याचा दीर्घ अनुभव आहे. नुकतीच भाजप मुख्यालयात त्यांनी जेपी नड्डा आणि
सरचिटणीस बीएल संतोष यांच्याशीही बैठक घेतली. दक्षिण भारतातील असल्याने भाजपसाठी
विस्ताराचा मार्ग मोकळा होईल.वनती या तामिळनाडूतील कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या
आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या
बऱ्याच काळापासून पक्षासाठी काम करत आहेत. वनती १९९३ पासून भाजपमध्ये आहेत आणि
संघटनेत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. भाजप अध्यक्ष होण्याच्या शर्यतीतही त्या
आघाडीवर आहेत.डी.पुरंदेश्वरी आंध्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या माजी अध्यक्षा
आहेत आणि त्या खूप अनुभवी नेत्या आहेत. त्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेचाही भाग आहेत.
पक्ष पुरंदेश्वरीवर खूप विश्वास ठेवतो. त्यामुळे त्यांचे नावही मंजूर होण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे.