खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्हावरील अंतिम सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात; महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित

नवी दिल्ली शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीच्या वादावर उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची आणि अंतिम सुनावणी होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल अखेर आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.

सुप्रीम कोर्टात उद्याची निर्णायक सुनावणी
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
१९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर सुनावणी सुरू असल्याने हा खटला थांबवण्यात आला होता.
आता उद्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अंतिम निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे.

निकालानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि "शिवसेना" हे नाव
➡️ एकनाथ शिंदे गटाकडे कायम राहणार की
➡️ पुन्हा उद्धव ठाकरे यांना परत मिळणार,
हे स्पष्ट होणार आहे.

 वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया
वकील असीम सरोदे म्हणाले –

सर्वोच्च न्यायालयाने उद्या शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
दरम्यान, मोदी नवी मुंबई विमानतळाचे दिखाऊ उद्घाटन करणार, पण संविधानाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या शिंदे यांचे राजकारण सुप्रीम कोर्ट जमिनीवर आणणार का, हे उद्या कळेल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.