मुंबई भाजप अध्यक्षपदी कोण मारणार बाजी ?
.jpeg)
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर भाजप आता मुंबई महापालिकेवर कब्जा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मागील तीन दशकांपासून उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने मुंबईत नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद' या अनुषंगाने भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर आता मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार, यावर चर्चा सुरू झाली असून मुंबईतील अनेक चेहरे समोर आलेत. विधानसभेत पराभव पत्करावा लागला तरी कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका हातून निसटता कामा नये, यासाठी उबाठा गटाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाची कामगिरी निराशाजनक असली तरी मुंबईत उबाठाने १० जागा जिंकून मुंबईवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
दुसरीकडे महायुतीकडून मुंबई महापालिकेवर यंदा भगवा
फडकवण्यासाठी कुठलीही कसर ठेवली जाणार नाही. विशेषतः भाजपने विधानसभा
निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात ठेवून मुंबईत तिकीट वाटप केले
होते. यापूर्वी मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक ही २०१७ मध्ये झाली होती. तेव्हा
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. परंतु मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही
पक्ष स्वतंत्र लढले होते आणि शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागी विजय संपादन केला
होता. २०१२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागा जिंकणाऱ्या भाजपने २०१७ च्या
निवडणुकीत ८२ जागांपर्यंत मजल मारली होती आणि भाजपने ही सर्व किमया मुंबई अध्यक्ष
आशिष शेलार यांच्या नेतृत्वात केली होती. परंतु यंदा आशिष शेलार यांची
मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी
मुंबई महापालिका निवडणूक लक्षात ठेवून मुंबईत तिकीट वाटप केले होते. यापूर्वी
मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक ही २०१७ मध्ये झाली होती. तेव्हा राज्यात
शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष
स्वतंत्र लढले होते आणि शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागी विजय संपादन केला होता. २०१२
च्या मुंबई महापालिका निवडणुकीत जागा जिंकणाऱ्या भाजपाने २०१७ च्या निवडणुकीत ८२
जागांपर्यंत मजल मारली होती आणि भाजपने ही सर्व किमया मुंबई अध्यक्ष आशिष शेलार
यांच्या नेतृत्वात करून दाखवली होती. परंतु, यंदा आशिष शेलार
यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली आहे.
भाजप मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात अग्रेसर नाव
बोरिवलीचे माजी आमदार सुनील राणे याचे आहे. सुनील राणे यांनी २०१९ मध्ये बोरिवली
विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले. परंतु, २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करून भाजपने संजय उपाध्याय यांना
उमेदवारी दिली आणि उपाध्यय सुद्धा या मतदारसंघातून विजयी झाले. परंतु, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईचे खासदार गोपाल
शेट्टी यांचा भाजपने पत्ता कापल्या नंतर त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. परंतु,
सुनील राणे यांचा विधानसभेत पत्ता कापल्यानंतर ते शांत राहिले
त्यांनी संयमाची भूमिका घेतली. त्यातच फळे आता त्यांना भेटू शकते. सुनील राणे
यांच्याबरोबर कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर, अंधेरी
पश्चिमचे आमदार अमित साटम आणि लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार
मनोज कोटक यांचाही नंबर अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. अशात अध्यक्षपदाची माळ
कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.