नव्या व्हायरसला न घाबरण्याचे who च्या संशोधकाचे आवाहन
.jpeg)
दिल्ली : ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) ची अनेक प्रकरणे
भारतात आढळून आली आहेत. या सोबतच नागरिक चिंतेत असून त्यांच्या मनात
एचएमपीव्हीबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या विषाणूच्या उदयानंतर, हा विषाणू कोविड -१९ सारखी महामारी पसरवू शकतो, असा
लोकांचा समज निर्माण झाला आहे. असा समज निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे
कोरोनाविषाणूप्रमाणेच या विषाणूचाही उगम चीनमधून झाला आहे. परंतु, एचएमपीव्ही विषाणू हा कोरोनासारखा धोकादायक असल्याबाबत अद्याप अशी कोणतीही
माहिती समोर आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) माजी
मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये एचएमपीव्ही व्हायरसबद्दल माहिती शेअर केली. या
विषाणूमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असेही त्या म्हणाल्या.