भीमातीर परिसरातील दहशत, रक्तपाताचा शेवट कधी होणार ? खुलेआम झळकणारे तलवार, कोयते, गोळीबारांचा आवाज थांबणार का ?

विजयपूर:  भीमातीर म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते,,ते वाळू माफिया,धाडसी दरोडा, गोळीबाराचा आवाज, निघृण खून, बेकायदेशीर शस्त्रे, खुलेआम झळकणारे तलवार, कोयते ,,,,! विजयपूर जिल्ह्यात अनेक संत महंतांचा जन्मभूमी, कर्मभूमी एकेकाळी या परिसरात हलसंगी सिंपी लिंगण्णा, मधुरचंन्नरु, गुरुलिंग कापसे असे ख्यात साहित्यिक, विचारवंतांनी राज्याचे लक्ष वेधले होते.  त्यानंतर भीमा नदी काठ परिसरात अर्थात भीमातीर म्हणजे मल्लिकार्जुन चडचाण, धर्मराज, गंगाधर चडचाण, पुत्रप्पा सावकार, तर दुसरीकडे चंदप्पा हरिजन, भागप्पा हरिजन, यांच्या गॅगच्या कुकृत्यामुळे "भीमातीरर हंत्यंकरु" अर्थात भीमा नदी काठ परिसरातील हत्यारे असे ओळख निर्माण झाले आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमारेषा म्हणून वाहत असलेली भीमा नदी, या नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा, बेकायदेशीर शस्त्रे खरेदी विक्री,, विजयपूर, कलबुर्गी, रायचूर जिल्ह्यात एकप्रकारे दहशत निर्माण झाली होती. जमीन विवादातून प्रारंभ झालेल्या भीमातीर परिसरातील हत्याकांडात पूर्ववैमनस्यातून अनेकांची हत्या झाली आहे. चंदप्पा हरिजन, धर्मराज व गंगाधर हरिजन या बंधूंच्या हत्या झाल्यानंतर या परिसर शांत झाले असे वाटत असतानाच मंगळवारी भागप्पा हरिजनची निघृण हत्येनंतर पुन्हा एकदा अल्लोळ कल्लोळ माजला आहे.  चंदप्पा हरिजनचा गॅग मधील बलिष्ठ, खतरनाक गुंड, शूटर म्हणजे भागप्पा हरिजन होय ! विजयपूर जिल्हा न्यायालय परिसरात त्याचावर प्राणघातक हल्ला झाला होता, तीन गोळ्या शरीरात घुसून ही तो वाचला होता. मात्र मंगळवारी रात्री भागप्पा हरिजनचा शेवट झाला. एखाद्या गुंडाची हत्या झाल्यानंतर संपले आता सर्व अशी चर्चा नागरिकांचात होत असताना आणखीन एकाची निघृणपणे हत्या केली जाते, अशारीतीने खून, खूनाचा प्रयत्नांची मालिका सुरूच आहे. भीमातीर परिसरात चंदप्पा हरिजन याने दहशत, रक्तपाताचा मालिका सुरू केली तर दुसरीकडे पुत्रप्पा साहुकार आणि मल्लिकार्जुन चडचाण या दोन कुटुंबातील जमीनीच्या सीमेवरून सुरू असलेल्या वाद विवाद अजूनही सुरूच आहे. २००८ साली महादेव साहुकार यांचे मोठे भाऊ पुत्रप्पा साहुकार याचावर लोणी बीके गावात निवडणूक प्रचार दरम्यान गोळ्या झाडण्यात आले पुत्रप्पाचा हत्येनंतर या दोन कुटुंबातील वैमनस्य आणखीनच वाढले. आरोपी मल्लिकार्जुन चडचाण अजून पर्यंत सापडलाच नाही तो जिवंत आहे का नाही हे सुद्धा कोणाला माहीत नाही. २०१६ मध्ये मल्लिकार्जुन चडचाण याचा मुलं धर्मराज व गंगाधर चडचाण यांचा विजयपूर जिल्ह्यात विशेष करून भीमातीर परिसरात वास्तव्य वाढू लागला. ३० ऑ.२०१७ रोजी चडचाण येथील कोकंणगांव येथे पोलिसांनी बनावट चकमकीत धर्मराज व गंगाधर यांची हत्या घडविण्यात आले, याची सुपारी महादेव साहुकार भैरगौंड यांनी दिल्याचा आरोप आहे.  त्यानंतर २ नोव्हेंबर २०२० रोजी विजयपूर -सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील अरकेरी तांडा जवळ महादेव साहुकार भैरगौंड याचावर ३०ते चाळीस जनांच्या टोळीने  हल्ला करून कारला टम्पर ने धडक देऊन गोळीबार, पेट्रोल बॉब  फेकून प्राणघातक हल्ला करण्यात आला तीन गोळ्या शरीरात घुसून ही महादेव साहुकार यास अनेक दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना नवजीवनच मिळाले असे बोलल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या भागात प्रारंभ झालेल्या भीमातीर परिसरात हत्याकांड थांबणार कि अजून किती जणांचे बळी जाणार हा प्रश्नच आहे.  भीमा तीर परिसरात दहशत, रक्तपाताचा शेवट कधी होणार याचीच चर्चा करण्यात येत आहे.

 

      दिपक शिंत्रे विजयपूर