काय आहे मंत्रालयातील शापित केबिनची कहाणी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे जेव्हा महायुती सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झाले. त्यावेळी अजित पवारांच्या सत्तेत येण्यानं मंत्रालयातलं केबिन नंबर ६०२ पुन्हा चर्चेत आलं होतं. मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरची ही एक केविन. ती केविन शापित असल्याची चर्चा मंत्रालयात होत राहते. कारण आजपर्यंत ती केबिन ज्या-ज्या मंत्र्याला मिळालीय, त्या-त्या मंत्र्याला त्याच्या राजकीय आयुष्यात तोंड द्यावं लागलंय. या अफवा असतानाच अजित पवारांनीही आता क्रमांक ६०२ ची केबिन घेण्यास नकार दिला होता. ह्या केविनचं रहस्य काय आहे आणि कोणालाच ही केबिन का नको? जाणून घेऊयात सविस्तर... मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्व मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं आहे. यामध्ये ६०२ नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे. ६०२ नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरला आहे. तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं. अजित पवार यांनी हे दालन घेण्यास नकार दिल्यानंतर सचिवांचा कक्ष रिकामा करण्यात आला आणि हे दालन पवार यांना देण्यात आलं. ६०२ हे केबिन अजित पवारांसाठी रिकामं असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव ब्रजेश सिंह तसंच उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचं केबिन रिकामं करण्यात आलं आणि ते अजित पवार यांना देण्यात आलं. ही ६०२ नंबरची केविन शापित असल्याची चर्चा नेहमीच होत राहाते. या अंधश्रद्धेमुळे बहुतेक वेळा हे दालन रिकामेच असते. इथे बसण्यास बहुतेक मंत्री टाळाटाळ करतात. ६०२ केबिनबद्दल मंत्रालयात एक चर्चा असते, की इथं जो मंत्री बसतो, त्याच्या राजकीय कसोटीचा काळ सुरु होतो. असं म्हणतात की २०१४ आधी ६०२ नंबरच्या केबिनमध्ये अजित पवार बसले होते. त्यानंतर योगायोगानं अनेकदा त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुचर्चीनं हुलकावणी दिली. सिंचनसह शिखर बँकेवरुन घोटाळ्याचे आरोप झाले. नंतर २०१९ मधली पहाटेची शपथ आणि २०२३ मधली दुपारची शपथ अशा देशभर गाजणाऱ्या दोन शपथविधी त्यांनी घेतल्या.
२०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसेंना ६०२ केविन दिली गेली होती. खडसेंकडे ७ हुन जास्त मंत्रिपदं होती. मात्र, त्यांच्यामागे आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आणि मंत्रिपदाच्या दीडच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते पांडुरंग फुंडकर ६०२ केबिनमध्ये आले. खडसेंच्या कृषिखात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र त्यांचं अकाली निधन झालं. पांडुरंग फुंडकरांनंतर भाजपचे अनिल बोंडे ६०२ केबिनमध्ये आले. फुंडकरांच्या कृषिखात्याची जबाबदारी बोंडेकडे आलो. मात्र, मंत्री असूनही २०१९ च्या निवडणुकीत बोंडेंचा पराभव झाला. नंतर राज्यसभेत खासदार घेऊन बोंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं. त्यानंतर पुन्हा ही केबिन चर्चेत येण्याचं कारण म्हणजे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर म हायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील चर्चे त असलेलं ६०२ क्रमांकाचे दालन शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालं आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये त्यांना ६०१, ६०२ आणि ६०४ अशी तीन दालनं शिवेंद्रराजेंना देण्यात आली आहेत. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे. पण तिथे कोणीही जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्वीकारणार का हे पाहावं लागेल.
मंत्रालयातले काही जण ६०२ केविन बदनाम होण्याच्या
चर्चामागे वास्तुशास्राचा दाखला देतात. वास्तुशास्त्रात घर किंवा कार्यालयाचं तोंड
दक्षिण दिसेला असणं अशुभ मानलं जातं. सहाव्या मजल्यावरच्या दालनांची रचना आणि दिशा
बघितली तर मुख्यमंत्र्यांचं दालन पूर्व दिशेला, प्रधान सचिवांचं दालन पश्चिम दिशेला,
उपमुख्यमंत्र्यांचं दालन उत्तर दिशेला आणि क्रमांक ६०२ दालन मात्र
दक्षिण दिशेला आहे, म्हणून ६०२ केबिनचा जेव्हाही विषय निघतो,
तेव्हा त्यात याचीही भर होते.