नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित? सत्यशोधन समितीचा धक्कादायक अहवाल

नागपूर : - नागपूरच्या महाल परिसरात 17 मार्च रोजी उसळलेल्या दंगलीबाबत भारतीय विचार मंच आणि नागरिक सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालातून हिंसाचार पूर्णतः पूर्वनियोजित होता, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या अहवालात नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.

सत्यशोधन समितीचे मुख्य निष्कर्ष:

  • कबरीच्या प्रतिकृती आणि हिरव्या कापडाची जाळपोळ हे निमित्त: या मागे काही दिवसांपासून विशिष्ट समाजामध्ये निर्माण केले गेलेले गैरसमज, आणि देशभरातील घटनांवर आधारित रोष होता.
  • हिंदू समाजाला लक्ष्य करणं: दंगल घडवण्याचा उद्देश विशिष्ट समुदायावर हल्ला, पोलिसांना हतबल करणे आणि कायद्याचे राज्य ढासळवणे हा होता.
  • महिला आणि अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये दहशत: महिलांवर लक्ष ठेवून घरांवर दगडफेक झाली. इस्लामच्या नावाने घोषणाबाजी करत महिलांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न.
  • पूर्वनियोजनाचे स्पष्ट संकेत: हिंसाचाराच्या आधीच अनेक व्यापारी आपली दुकाने आणि साहित्य हटवून गेले होते.
  • पोलिसांची अपयशी तयारी: पोलीस गुप्तचर माहिती गोळा करण्यात अयशस्वी ठरले. सीसीटीव्ही सुविधा नसणे, सुरक्षेच्या साधनांची कमतरता आणि फक्त लाठीमाराचे आदेश यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
  • हिंसक जमावाचे स्पष्ट उद्दिष्ट: दुसऱ्या धर्माच्या नागरिकांची मालमत्ता, वाहने, घरे यांना लक्ष केले गेले.
  • 35-40 पोलीस जखमी: हिंसाचारादरम्यान पोलिसांवर थेट हल्ले, परिणामी अनेक पोलीस अधिकारी आणि जवान जखमी झाले.
  • नागरिकांची मदत मिळवण्यात अपयश: अनेक नागरिकांनी पोलीस कंट्रोल रूम व स्थानिक पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उपयोगी प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रार.

घटना कधी घडली17 मार्च रोजी महाल परिसरात दोन गटांत वाद निर्माण झाला आणि दगडफेकीनंतर मोठ्या प्रमाणावर दंगल भडकली. यामध्ये शेकडो वाहनांची जाळपोळ, दुकानांचे नुकसान आणि सामाजिक तणाव निर्माण झाला. गुन्हे आणि अटकेत आरोपी:

  • मुख्य आरोपी फिहम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
  • दंगलीत सामील असलेल्या शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.