बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली: संसदीय कामकाज मंत्री किरेन
रिजिजू यांनी आज (बुधवारी) लोकसभेत बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले.
विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- सरकार
कोणत्याही धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करणार नाही.
- हे
विधेयक केवळ वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे.
- मंदिर, मशीद
किंवा इतर धार्मिक स्थळांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे
विधान:
- २०१३
मध्ये यूपीए सरकारने वक्फ बोर्डाला असे अधिकार दिले होते की, त्यांच्या
आदेशाला कोणत्याही दिवाणी न्यायालयात आव्हान देता येत नव्हते.
- जर
यूपीए सत्तेत राहिली असती,
तर संसद भवन, विमानतळ यासारख्या इमारतीही
वक्फ मालमत्ता घोषित झाल्या असत्या.
विरोधकांचा आक्षेप:
- क्रांतिकारी
समाजवादी पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांनी विधेयकाला विरोध केला.
- त्यांनी
म्हटले की,
जेपीसीला (संयुक्त संसदीय समिती) विधेयकात सुधारणा करण्याचा
अधिकार नाही.
- लोकसभा
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले की, जेपीसीला
पूर्ण अधिकार आहे.
संसदेत गदारोळात चर्चेला सुरुवात:
विरोधी पक्षांच्या जोरदार
आक्षेपांमुळे लोकसभेत गदारोळाच्या वातावरणात वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू
झाली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता हे विधेयक सादर करण्यात आले.