देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत मतदान सुरू

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान होत आहे. सकाळी १० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मतदान केलं. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे.

लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ सदस्य अशा एकूण ७८० खासदारांना मतदानाचा हक्क आहे. विजयी होण्यासाठी किमान ३९१ मतांची आवश्यकता आहे. मात्र, बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल यांनी मतदानातून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने विजयी मतांची संख्या आता ३८५ वर आली आहे.

 मतांचे गणित

  • एनडीएकडे सध्या ४२५ खासदारांचा पाठिंबा असून, वायएसआरसीपीच्या ११ मतांमुळे राधाकृष्णन यांची बाजू मजबूत झाली आहे.
  • विरोधी आघाडी कडे ३२४ खासदारांचा पाठिंबा आहे.
  • या गणितानुसार एनडीएचा विजय निश्चित मानला जात आहे.

 सीपी राधाकृष्णन यांची प्रार्थना
मतदानापूर्वी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतील लोधी रोड परिसरातील श्रीराम मंदिरात जाऊन प्रार्थना केली.