दिल्ली विधानसभेसाठी चुरशीने मतदानास प्रारंभ सकाळी ९ पर्यंत दहा टक्के मतदान

नवीदिल्ली :  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळपासून मतदान सुरू झाले. राजधानीतील ७० जागांवर मतदान सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. सुमारे ७०० उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघातील आप उमेदवार आतिशी म्हणाल्या, "दिल्ली निवडणुका या सार्वत्रिक निवडणुका नाहीत, तर धार्मिक युद्ध आहे. हे चांगले आणि वाईट, काम आणि गुंडगिरी यांच्यातील लढाई आहे. आपण जिथे जात आहोत तिथे दिल्लीचे लोक विकासाच्या सोबत आहेत. दिल्ली पोलिस भाजपला निवडणूक लढवण्यासाठी उघडपणे मदत करत आहेत. एका बाजूला भाजपची गुंडगिरी तर दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे."असा आरोप अतिशी यांनी केला आहे