तीन वेळा पाकिस्तान, एकदा चीन दौरा – युट्यूबर ज्योती मल्होत्रावरचा संशय वाढतोय!

हिसार : हरियाणातील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी
कथित हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा
ही पाकिस्तानातील गुप्तचर संस्था पीआयओ (Pakistan Intelligence
Organization) साठी काम करत होती. तिचा वापर भारताविरोधातील
कथनात्मक युद्धासाठी करण्याचा प्रयत्न सुरू होता. हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक
कुमार सावन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पीआयओ सोशल
मीडियावर सक्रिय असलेल्या प्रभावकांना भरती करत आहे. ज्योती
मल्होत्रा ही त्यातली एक आहे. ती तीन वेळा पाकिस्तानला गेली असून, एकदा चीनलाही भेट दिली होती. ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेतून तिने या देशांना
भेटी दिल्या.” ‘ट्रॅव्हल विथ जेओ’ हा तिचा युट्यूब चॅनल असून
लाखो फॉलोअर्स आहेत. पोलिसांच्या मते, ती सोशल मीडियाच्या
माध्यमातून पाकिस्तानी प्रोपगंडाचा प्रचार करत होती. ही संकल्पना ‘नॅरेटिव्ह वॉरफेअर’ (कथनात्मक युद्ध) म्हणून ओळखली
जाते, ज्यामध्ये प्रभावक एजंट म्हणून वापरण्यात येतात.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी थेट
संपर्क
एसपी सावन यांनी सांगितले की, ज्योतीचा संपर्क पाकिस्तानी
उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी होता. 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा मिळवताना ती दानिशला भेटली. त्यानंतर
पाकिस्तानात तिच्या राहण्याची व्यवस्था याच अधिकाऱ्याने केली. याच काळात ती पाकिस्तानी
एजंटांशी प्रत्यक्ष भेटली. बाह्य निधीचा संशय पोलिसांनी
तिच्या उत्पन्न व खर्चातील मोठी तफावत निदर्शनास आणली आहे. “ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर
असूनही तिच्याकडे मोठ्या प्रमाणात परदेश प्रवास आणि खर्चाची नोंद आहे,” असे सावन यांनी सांगितले. तिचे बँक व्यवहार, सोशल
मीडियावरील संवाद, आणि डिजिटल डिव्हाइसेसची फॉरेन्सिक तपासणी
सुरू आहे.
कोणती कारवाई झाली आहे?
- ज्योती
मल्होत्राला गोपनीयता कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत
अटक करण्यात आली आहे.
- तिला
५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- तिच्या
लॅपटॉप,
मोबाईल व इतर डिजिटल उपकरणांची चौकशी सुरू आहे.
- पैशांचे
व्यवहार,
पाक एजंटांशी संबंध, आणि प्रवास इतिहास यांची
सखोल तपासणी केली जात आहे.