राम मंदिर आणि हनुमानगढीला भेट; एलॉन मस्क भारावले – भारतातील अनुभव अद्भुत!

अयोध्या जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क आणि बहिण अलेक्झांड्रा मस्क यांनी बुधवारी अयोध्येतील राम मंदिर तसेच हनुमानगढी मंदिराला भेट दिली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील "सर्वोत्तम गोष्टींपैकी एक" असल्याची प्रतिक्रिया एरोल मस्क यांनी दिली आहे. दुपारी २:३० वाजता अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम हनुमानगढी मंदिराला आणि नंतर राम मंदिर प्रांगणाला भेट दिली. ते म्हणाले, मी इथे आलो याचा मला खूप आनंद आहे. मी मंदिर पूर्ण होईपर्यंत थांबू शकत नाही. हे भव्य मंदिर जगातील चमत्कारांपैकी एक ठरेल. माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.” भारतातील अनुभव अद्भुत – मस्क दोन्ही मंदिरांना भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना एरोल मस्क म्हणाले, भारतातला माझा अनुभव अतिशय अद्भुत आहे. मी सर्वोटेक (सर्वोटेक कंपनी) सोबत काम सुरू करण्यासाठी येथे आलो आहे. देशात अधिक काळ घालवण्यास उत्सुक आहे. मंदिरे आणि लोक दोन्हीही अद्वितीय आहेत.” विशेष म्हणजे, मंदिर भेटीदरम्यान एरोल मस्क पारंपरिक कुर्ता-पायजमा परिधान करून आले होते. त्यांच्या या वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.