सुटकेसमध्ये गर्लफ्रेंडला नेणारा व्हिडीओ व्हायरल: सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानंतर धक्कादायक सत्य समोर

एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून घेऊन जात असताना तिला धक्का लागल्यानं ती जोरात ओरडते. तिचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षकांनी तात्काळ अडवले आणि सुटकेसची तपासणी केली. तपासणी दरम्यान, त्यात एक तरुणी लपवून ठेवलेली आढळली. हा व्हिडीओ जिंदाल युनिव्हर्सिटीचा असल्याचा दावा केला जात आहे, परंतु याबाबत अद्याप जिंदाल युनिव्हर्सिटीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमठल्या आहेत. काही युजर्सने सुटकेसचा वापर अशा प्रकारे होणं खूपच विचित्र आहे असं म्हटलं, तर काहींनी या विचाराला चांगलं आणि स्मार्ट ठरवलं. हॉस्टेलमध्ये सुटकेसमधून गर्लफ्रेंडला आणण्याच्या या अजब पद्धतीवर काही युजर्सनी अशा प्रकारे 'आमची वेळ गेली' अशा टिप्पण्या केल्या आहेत. आता व्हिडीओचा तपास सुरु आहे आणि संबंधित संस्था या प्रकरणावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.