विजयपूर महापालिकाचा सदस्यांच्या अपात्र आदेशास स्थगिती

विजयपूर : महापालिका सदस्यांना अपात्र ठरवून बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या आदेशावर कलबुर्गी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे सदस्यांना न्याय मिळाला आहे. महापालिका सदस्यांनी आपली मालमत्ता जाहीर केला नसल्याच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करून आयुक्तांनी संविधानविरोधी पद्धतीने कारवाई केली होती. त्या निर्णयाविरोधात शहराचे आमदार बसनगौडा पाटील यतनाळ, सदस्य किरण पाटील आणि इतर सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देऊन दिलासा दिल्यामुळे सदस्यांना न्याय मिळवून दिला आहे. या प्रकरणात वकिल अमितकुमार देशपांडे व श्रीनाथ कुलकर्णी यांनी युक्तिवाद सादर केला, असे शहर आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दिपक शिंत्रे