उपराष्ट्रपती निवडणूक : मतदान आज; एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध ‘इंडिया’ ब्लॉकचे बी. सुदर्शन रेड्डी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी १० ते सायंकाळी ५ या
वेळेत मतदान पार पडणार आहे. यावेळी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि विरोधी
‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना
आहे.
मतदानापासून
दूर राहणारे पक्ष:
- बीजेडी (७ खासदार)
- बीआरएस (४ खासदार)
- अकाली दल (३ खासदार)
या तिन्ही पक्षांची एकत्रित संख्या १४ खासदार आहे. त्यामुळे मतदानाचा
आकडा ७८१ वरून घटून ७६७ झाला आहे. विजयसाठी आता किमान ३८४ मतांची गरज राहिली आहे.
नंबर गेम
- एनडीएला लोकसभा आणि राज्यसभेत मिळून ४२५ खासदारांचा
पाठिंबा
- वायएसआरसीपीने पाठिंबा दिल्यानंतर आकडा ४३६ वर
- विरोधकांकडे एकूण ३२४ मते
- विजयाचा फरक किमान ११२ मतांचा स्पष्ट
राजकीय अर्थ
- २०२२ मध्ये या तिन्ही पक्षांनी एनडीएच्या जगदीप
धनखड यांना पाठिंबा दिला होता.
- यंदा मतदानापासून दूर राहिल्याने एनडीएच्या विजयावर
परिणाम नाही, पण विजयाचा फरक
कमी होईल.
- काँग्रेसने गैर-राजकीय चेहरा देऊन विरोधकांना एकत्र
आणण्याचा प्रयत्न केला, मात्र बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलांचा पाठिंबा न मिळाल्याने विरोधकांतील फूट
स्पष्ट झाली.
- उपराष्ट्रपती निवडणुकीत व्हीप लागू नसल्यामुळे क्रॉस
व्होटिंगची शक्यता नाकारता येत नाही.