दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेकडून विविध पुरस्कार जाहीर

मंद्रूप : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त  देण्यात येणारे  आदर्श सन्मान पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रशासकीय सेवेसह समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या सन्माननीय व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले, दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वतीने यंदा विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रशासनातील अधिकारी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पत्रकारिता, कृषी व युवकांसाठी प्रेरणादायी काम केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येत आहे. तसेच यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांचाही गौरव करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर पत्रकार संघटना दरवर्षी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असते.यंदाही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लवकर  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरस्कार प्राप्त मान्यवरांची निवड करण्यात आली.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे अशी,  महसूल प्रशासन : किरण जमदाडे, तहसीलदार दक्षिण सोलापूर  पोलीस प्रशासन : मनोज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रूप

आरोग्य : डॉ. अशोक राठोड, वैद्यकीय अधीक्षक मंद्रूप आदर्श समाजसेवक; महादेव कोगनुरे

जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार : विजय देशपांडे (तरुण भारत संवाद), विजय साळवे (दिव्य मराठी), अजित उंब्रजकर(सुराज्य), अनिल कदम(संचार), काशीनाथ वाघमारे(लोकमत),

आदर्श शिक्षक: निलेश नंदरगी, जनाबाई पवार, प्रतिभा दुधगी,फरजाना सय्यद,

आदर्श क्रीडाप्रशिक्षक : शिवराज मुगळे, सामाजिक व युवा प्रेरणा : काशिनाथ भतगुणकी,

आदर्श शेतकरी: गंगाधर बिराजदार (निंबर्गी), पंडीत बुळगुंडे(संजवाड)पुष्पा खातेनवरु (नांदणी)