सर्वात उंच पुलावरुन धावली वंदे भारत एक्सप्रेस!

चिनाब : जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पुलावरून प्रजासत्ताक दिनाच्या
मुहूर्तावर २६ जवेवरी रोजी वंदे भारत
एक्सप्रेस धावली. जम्मू आणि काश्मीरमधील
चिनाब नदीवर बांधलेला हा सर्वात उंच पूल बांधण्यासाठी रेल्वेला २० वर्षांहून अधिक
काळ लागला. हा आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असलेला कमानी पूल आहे, जो बांधण्यासाठी रेल्वेला १४ हजार कोटी रुपये खर्च आला. सुमारे १ हजार ३१५
मीटर लांब आणि ३५९ मीटर उंच असलेल्या या अद्भुत पुलावरून जेव्हा वंदे भारत
एक्सप्रेस गेली तेव्हा ते दृश्य खरोखरच पाहण्यासारखे होते. वंदे भारत ट्रेन गेली.
१ मिनिट १५ सेकंदाचा व्हिडिओ पाहणाऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, एका ऐतिहासिक क्षणी, वंदे भारत ट्रेनने जम्मू आणि
काश्मीरच्या रियासी येथील प्रतिष्ठित चिनाब पूल ओलांडला, जो
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, हे खरोखरच अद्भुत दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर
कमेंट करत काही वापरकर्ते हे दृश्य लाईव्ह अनुभवण्यासाठी तिकिटे बुक करण्याबद्दल
बोलत आहेत.