सरपंच हत्या प्रकरणात वाळ्मिक कराड यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला; संपत्ती जप्तीचा निर्णय राखून

बीड | 21 जुलै 2025:
बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकऱ्यांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 
7 जुलै रोजी या अर्जावर युक्तिवाद झाला होता. आज न्यायालयात सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार विरोध नोंदवला. निकम म्हणाले: "प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोषमुक्तीचे अर्ज सादर करतोय, यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जात आहे. हे प्रकरण लवकरात लवकर 'चार्ज फ्रेम' होणे आवश्यक आहे.त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दोषमुक्तीचे सर्व अर्ज फेटाळले, तर संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. हत्येचा थरारक तपशील 9 डिसेंबर 2024 रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 7 आरोपींना अटक झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पुढील सुनावणी या खटल्यात 4 ऑगस्ट 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.