वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी फरार सासरा आणि दीर अखेर अटकेत

पुणे :- वैष्णवी हगवणे
आत्महत्या प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि
दीर सुशील हगवणे यांना अखेर बावधन पोलिसांनी पहाटे 4.30 वाजता
अटक केली. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली असून, याआधी
तिच्या सासू, नवरा आणि नणंद यांना देखील अटक करण्यात आली
होती.
या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले
की, "एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त
करणे गंभीर गुन्हा आहे, आणि अशा प्रकारच्या कृत्यांवर
कायद्याची कडक कारवाई होणारच आहे."
फडणवीस काय म्हणाले?
फडणवीस म्हणाले, "एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये भेदभाव करणे ही मानसिकता अत्यंत चुकीची आहे. अशी वागणूक देणे हे पाप आहे." त्यांनी असेही नमूद केले की, "सर्व शक्य त्या कायदेशीर कारवाया या प्रकरणातील दोषींवर केल्या जातील." मकोका लावण्याची मागणी, फडणवीसांचा खुलासा कसपटे कुटुंबीयांनी आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "मकोका लावण्यासाठी ठराविक कायदेशीर अटी आहेत. त्या निकषांमध्ये हे प्रकरण बसते का, याचा निर्णय तज्ज्ञ घेतील." अटकेआधी बिर्याणी आणि मटणावर ताव; CCTV फुटेज व्हायरल राजेंद्र आणि सुशील हगवणे हे अटकेपूर्वी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवताना दिसले. मटण खातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यावर फडणवीस म्हणाले, "पोलिसांनी त्यांना अटक केली, हीच बाब महत्त्वाची आहे. आता या घटनेचे अतिराजकारण करणे योग्य नाही." पोलीस करतील पत्रकार परिषद या अटकेसंदर्भात पोलीस लवकरच अधिकृत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अटक झालेल्या आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई लवकरच केली जाणार आहे.