वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात खळबळ; अखेर 9 महिन्यांच्या बाळाचा शोध पूर्ण

पुणे | १३ मे २०२५
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात
खळबळ उडवली असतानाच या प्रकरणाला आज एक नवे वळण मिळाले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर
हरवलेले तिचे ९ महिन्यांचे बाळ अखेर सापडले असून ते आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात
आले आहे. बाळ एका अज्ञात व्यक्तीने सुपूर्द केल्याची माहिती वैष्णवीचे नातेवाईक कस्पटे
कुटुंबीयांनी दिली आहे. अज्ञात फोन आणि बाळाची सुपूर्दगी वैष्णवीच्या कुटुंबीयांना
एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने सांगितले की,
“बाणेर हायवेजवळ या आणि तुमचे बाळ घेऊन जा.” त्यानुसार
वैष्णवीचे काका तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना ९ महिन्यांचे बाळ सुपूर्द करण्यात
आले. या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
“बाळातच आम्हाला
वैष्णवी दिसते” – वडिलांचा भावनिक प्रतिसाद
माध्यमांशी संवाद साधताना वैष्णवीचे
वडील म्हणाले, “माझ्या भावाला
अज्ञात व्यक्तीने बाळ दिलं. आम्हाला बाळाच्या रूपात वैष्णवीच दिसते. तिच्या
आठवणींसोबतच आम्ही या बाळाचा सांभाळ करू.”
बाळ कोठे होते? आणि काय घडले होते?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश
चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. वैष्णवीच्या पतीच्या मावस भावाकडे बाळ सोपवण्यात
आले होते. बाळाच्या आजोबांनी जेव्हा ते आणण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप त्यांनी
केला होता. त्यानंतर तीन दिवस बाळ वैष्णवीच्या मावसभाऊ अमित पोवळे यांच्याकडे होते.
अखेर, बाळ सुरक्षितपणे आई-वडिलांकडे सोपवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना फोन करून कडक कारवाईचे आदेश
दिले आहेत. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहितीही समोर
आली आहे.