शेतकऱ्यांना विनातारण दोन लाखांचे कर्ज -विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून त्वरित अंमलबजावणी
.jpeg)
सोलापूर, दि. ११- रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणानुसार शेतकऱ्यांना आता दोन लाखांपर्यंत विनातारण शेतीकर्ज मिळणार आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने या योजनेची त्वरित अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती बँकेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक रमेश खाडे यांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांनी याअगोदर दोन लाखांपेक्षा कमी कर्ज घेतले आहेत, त्यांनाही आता कर्ज रक्कम वाढवून घेता येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या शाखेस भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खाडे यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या महत्वाकांक्षी धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून राष्ट्रीयीकृत बँकांनी कोणतीही अडवणूक न करता शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.