जाहिरात एजन्सी फेडरेशनच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड
.jpeg)
महाराष्ट्रातील अॅडव्हर्टायझिंग एजन्सीजची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या फेम (फेडरेशन ऑफ डव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स) ची वार्षिक सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. २०२७-२९ या कालावधीसाठी अध्यक्ष (इलेक्ट) म्हणून संदीप जव्हेरी (सोलापूर) यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी 'फेम'च्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. फेमचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे व मावळते अध्यक्ष महेश कराडकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सन २०२५ २७ या कालावधीसाठी अध्यक्षपदी रवी पवार (नाशिक), उपाध्यक्ष प्रकाश शहा (पुणे), सचिव रामदेव व्यास (छत्रपती संभाजीनगर), सहसचिव अजिंक्य उजळंबकर (छत्रपती संभाजीनगर), खजानीस कौस्तुभ नाबर, (कोल्हापूर) कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय साताळकर (पुणे), सुनील बासरानी (कोल्हापूर), दीपक जगताप (नाशिक), संतोष उदगिरी (सावा), राहुल देशपांडे (सातारा), नरेंद्र चौधरी (जळगाव), अरुण मलिक (छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र म्याना (अहिल्यानगर), सुनील बुधवानी (नागपूर), राजेश वाळवेकर (बेळगाव), परेश पेडणेकर (कोकण) यांची निवड करण्यात आली. कौस्तुभ नाबर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक अहवाल सादर केला त्यास मंजुरी देण्यात आली. नूतन अध्यक्ष रवी पवार यांनी जाहिरात एजन्सीच्या उन्नतीसाठी येणाऱ्या काळात विविध सेमिनार तसेच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले