छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ सुवर्ण होन प्रदर्शन

आज श्री. किशोर चंदक यांच्या "अनोखे प्रदर्शन" ला भेट देण्याचा योग आला, जिथे ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंचा खजिना अनुभवायला मिळाला. या प्रदर्शनातील काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ सुवर्ण होन काकतीय साम्राज्याच्या (वारंगळ) सुवर्ण नाणी 2000-2500 वर्षांपूर्वीची जनपद, गुप्त व इतर शासकांची सुवर्ण, चांदी व तांब्याची नाणी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरची चलनी नोटा व स्मारक नाणी (19 प्रकारांची चांदीची नाणी)  मुघल साम्राज्याच्या राशीवर आधारित दुर्मिळ सुवर्ण नाणी आणि सोलापूरची ऐतिहासिक नाणी जगातील पहिले तिकीट व पहिले पाकीट, भारतातील पहिली तिकिटे याशिवाय, महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित नाणी व तिकीट संग्रह, हिटलरने काढलेली चित्रे, आणि जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक, भारतरत्न पुरस्कार विजेते तसेच चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या चांद्रवीरांच्या स्वाक्षऱ्या पाहण्याची संधी मिळाली. या दुर्मिळ वस्तू सोलापूरकरांसाठी एका सुवर्णसंधीचे दार उघडतात. आपल्या परिवारासोबत या ऐतिहासिक प्रदर्शनाला नक्की भेट द्या!

प्रदर्शनाचे स्थळ: एसपीएम इंग्लिश स्कूल (हरीबाई देवकरण प्रशाला), सोलापूर.

तारीख: 21 व 22 डिसेंबर 2024 वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00  प्रवेश: मोफत