अन अकॅडमीचा सोलापुरात ‘आरंभ’

सोलापूर :  जेईई, आयआयटी प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन मिळावे, यासाठी 'अन अकॅडमी' ने सोलापुरात आपले केंद्र सुरू केले आहे. अन अकॅडमीचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशांत जैन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजावे आणि अभ्यासाचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी संस्था ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्गदर्शन देत आहे. इंजिनीयरिंग आणि मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या IIT, JEE, NEET आणि MHT-CET परीक्षांच्या तयारीसाठी १० वीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी अन अकॅडमीने 'आरंभ' या सेमिनारचे आयोजन केले. या वेळी जैन यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षा विषयनिहाय असते, तर प्रवेश परीक्षा दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित असते आणि ती एका दिवसात घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन व नियमित चाचणी सराव करणे आवश्यक आहे. अन अकॅडमीची सध्या पुणे, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, चंदीगड, नागपूर, कोल्हापूर या प्रमुख शहरांमध्ये ७५ मार्गदर्शन केंद्रे आहेत. यामध्ये सोलापूरची नव्याने भर पडली आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे दूरवरच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. सेमिनारमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक अनमोल शर्मा यांनी परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य कसे जपावे, यावर मार्गदर्शन केले. तसेच 'अन अकॅडमी' मुंबई केंद्राचे अकॅडमिक प्रमुख सियाराम कुमार यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त टिप्स दिल्या. कार्यक्रमाला संचालक नितीन जाधव, बलवीर जाधव, आप्पासाहेब केदार, शैलेजा केदार, महादेव जाधव, यशपाल सिंग बुंदेला, विजय चौहान यांची उपस्थिती होती. सुभाष राठोड व प्रशिक चलवादी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.