UAE चा नवा गेमचेंजिंग 'गोल्डन व्हिसा' : फक्त ₹23 लाखात आजीवन परवानगी!

नवी दिल्ली :- संयुक्त अरब अमिराती (UAE)
भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. UAE ने
आपल्या गुंतवणूक-आधारित पारंपरिक रेसिडेन्सी मॉडेलमध्ये मोठा बदल करत
नॉमिनेशन-आधारित गोल्डन व्हिसा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कोणतीही
प्रॉपर्टी किंवा व्यवसायात गुंतवणूक न करता फक्त AED 1,00,000 (सुमारे ₹23.3 लाख) एकदाच भरून आजीवन रेसिडेन्सी
व्हिसा मिळणार आहे. कशी होती आधीची अट? आधी UAE मध्ये गोल्डन
व्हिसा मिळवण्यासाठी किमान २ मिलियन दिरहम (सुमारे ₹4.66 कोटी)
ची मालमत्ता घेणे बंधनकारक होते. परंतु आता ही अट पूर्णपणे
रद्द करण्यात आली आहे. आता कशावर मिळेल व्हिसा? नवीन योजनेत व्हिसा मिळवणे फक्त
आर्थिक आधारावर ठरणार नाही. तुमचा कामाचा अनुभव,
शिक्षण, कला-कौशल्य, आणि
UAE ला होणारा संभाव्य फायदा यावर निवड होईल. कोणाला लागू होईल ही योजना?
सध्या हा प्रकल्प प्रायोगिक
स्वरूपात भारत आणि बांगलादेशमधील अर्जदारांसाठी सुरू करण्यात आला आहे.
UAE सरकारच्या अंदाजानुसार पहिल्या तीन महिन्यांत भारतातून ५,००० अर्ज येतील. भारतामध्ये या प्रक्रियेचे
व्यवस्थापन रायाद ग्रुप करत असून, अर्ज VFS किंवा One Vasco केंद्रांत किंवा ऑनलाइन करता येईल. अर्ज सोपा नाही! हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदारांची
सखोल चौकशी केली जाणार आहे:
- बॅकग्राऊंड
तपासणी
- आर्थिक
व्यवहारांची तपासणी
- फौजदारी
गुन्हे नाहीत याची खात्री
- सोशल
मीडिया स्क्रिनिंग
शेवटचा निर्णय UAE सरकार घेईल.
या व्हिसाचे प्रमुख फायदे:
✅ तुम्ही कुटुंबासोबत राहू शकता
✅ घरगडी नोकर ठेवू
शकता
✅ स्वतःचा व्यवसाय
किंवा नोकरी करू शकता
✅ प्रॉपर्टी विकल्यावर
व्हिसा रद्द होत नाही – तो आजीवन तुमच्याकडे राहतो
तज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भारत-UAE संबंध आणखी दृढ होतील आणि उच्च कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना मोठी संधी
मिळेल.