पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

विजयपूर:
तालुक्यातील कुमटगी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सहा तरुण कुमटगी तलावात पोहण्यासाठी गेले होते, मात्र त्यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

🔹 मृत तरुणांची नावे:
कैफ जमादार (वय १९)
सोहेल हत्तारकीहाळ (वय २५)

🔹 चार तरुण सुखरूप बचावले
या दुर्घटनेदरम्यान चार तरुणांना वाचवण्यात यश आले. मात्र, एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

🔹 पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.