बांगलादेशला झटपट दोन धक्के

दुबई :  नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशीला झटपट दोन धक्के दिले आहेत. सामन्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये मोहम्मद शमीने बांगलादेशला पहिला धक्का दिला. केवळ एक रन काढून सलामीवीर सौम्या सरकार बाद झाला. त्या पाठोपाठ दुसऱ्या ओव्हर मध्ये हर्षित रानाने नजमूल हसीन चा बळी घेतला. पहिल्या पाच ओव्हर मध्ये बांगलादेशची अवस्था दोन बाद 22 अशी आहे.