प्रलंबित मागण्यासाठी जुळे सोलापूरकरांची महापालिकेवर मोर्चा : घोषणाबाजी मुळे परिसर दणाणले

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागात आणि जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसाठी सुसज्ज दवाखाना आणि प्रसुतीगृह, नवे सुसज्ज बसस्थानक, नाट्यगृह आणि पालिकेची इंग्रजी माध्यम शाळा, महात्मा बसवेश्वर उद्यान, अद्यावत भाजी मंडई या सर्व उपक्रमांसाठी सोईच्या जागेचे आरक्षण ठेवून आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना सादर केले. मोर्चेकर्‍यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे  महानगरपालिका परिसर दणाणून गेले. यावेळी बोलताना विविध नेत्यांनी जुळे सोलापूरकरांना मिळत असलेल्या सावत्र वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला. गेल्या पंचवीस वर्षापासून जुळे सोलापूरकरांना सोयी सुविधांपासून लांब ठेवणाऱ्या  प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आला.