सोलापूर येथील पानीवेस तालीम गणेश मंडळाच्या महोत्सव अध्यक्षपदी तुषार पवार यांची निवड झाली.
.jpeg)
सोलापूर : मानाचा पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी तुषार पवार तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत वानकर यांची निवड करण्यात आली
सोलापुर शहरातील मानाचा पाणीवेस तालीम गणपती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पाणीवेस येथील कै.रामकृष्ण वानकर सांस्कृतिक भवन येथे पार पडली.
२०२५/२६ नुतन पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाचे सल्लागार चंद्रकांत वानकर व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या
उपस्थितीत निवड करण्यात आली
या बैठकीत सर्वानुमते तुषार बंडोपंत पवार यांची उत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत वानकर यांची निवड करण्यात आली.
पुढील पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष दिग्विजय नवगिरे,राहुल पवार,सेक्रेटरी अक्षय देवरे,सहसेक्रेटरी सुरज काटकर,रविराज हुरसुरे,खजिनदार राहुल काशीद,दिनेश नळे,लेझीम प्रमुख संतोष नायकु,मिरवणूक प्रमुख नागेश काशीद प्रसिध्दीप्रमुख प्रसाद झुंजे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर श्रींची आरती करुन नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आली.