बोरामणी येथे विहिरीचा कठडा ढासळून दोन मुले अडकली

कासेगाव:-दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर पासून 17 किलोमीटर अंतरावर बोरामणी गावच्या शेतात ही दुर्देवी घटना दत्तात्रय शेळके यांच्या शेतातील विहिरीमध्ये घडली. 

      सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना उन्हाची तलखी भागवण्यासाठी विहिरीत पोहायला गेलेली पाच किशोरवयीन मुले दगडी कठडा कोसळून ढिगार्‍याखाली अडकली होती त्यातील तीन मुलांना काढण्यात यश आले तर दोन मुले आणखीन ढिगार्‍याखाली सापडली आहेत. नैतिक सोमनाथ माने वय 14 आणि संघराज हरिबा राजगुरू वय 12 आशिया दुर्घटनेतील दोन मुलांची नावे आहेत. नैतिक माने हा इयत्ता नववीच्या वर्गात तर संघराज्यगुरू हा सातवीच्या वर्गात शिकत आहे त्यांच्या शालेय परीक्षेचा निकाल सकाळीच लागून दोघेही उत्तीर्ण झाले होते. 

 कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच व त्यातच परीक्षेचा उत्तीर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन नैतिक माने व संघराज राजगुरू यांच्यासह अन्य तीन मुले गावच्या शिवारात दत्तात्रय शेळके यांच्या शेतातील विहिरीत उन्हाची तलखी भागवण्यासाठी पाहायला गेली होती. विहिरीचे बांधकाम हे दगडी बांधकाम होते जवळजवळ 35 ते 40 फूट खोल विहीर होती सर्व पाच मुले विहिरीत मनसोक्त पोहत असतानाच अचानकपणे विहिरीच्या एका बाजूचा दगडी भिंतीचा कठडा कोसळला. यात त्या बाजूकडे असलेली दोन्ही मुले दगडी भिंती कठड्याच्या ढिगार्‍याखाली सापडली सुदैवाने इतर तीन मुले विहिरीच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे ती बालम बाल बचावली. शेळके यांच्या शेतात आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतातील ग्रामस्थ धावून आले सोलापूर तालुका पोलिसांसह दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य हाती घेऊन विहिरीतून दोन्ही मुलांना काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले विहिरीत पाणी गढूळ असल्याने त्यातील खोलगट भाग दिसत नव्हता विहिरीतील पाण्याचा उपसा केला जात होता सायंकाळपर्यंत बचाव कार्य सुरू हो

ते.