बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना: काही तासांच्या अंतराने तरुण व अल्पवयीन मुलीची आत्महत्या; गावात शोककळा

पांगरी :- बार्शी तालुक्यातील पांढरी
गावात सोमवारी घडलेल्या दोन आत्महत्यांमुळे संपूर्ण गावात हळहळ आणि खळबळ उडाली
आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने समर्थ ऊर्फ बाळू दत्तात्रय लोंढे (वय २०) व आरती
दीपक कसबे (वय १७) यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर
आलेले नाही.
दोघेही शेजारी, एकाच गावात राहत होते
पहिल्या घटनेत, दुपारी दोनपूर्वी समर्थ लोंढे याने शेतातील
चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतला, अशी माहिती
त्यांचे चुलते संजय रावसाहेब लोंढे (वय ४८) यांनी पांगरी पोलिसांना दिली. दुसऱ्या
घटनेत, आरती कसबे हिने राहत्या घरातील लोखंडी पाइपला गळफास
घेऊन आत्महत्या केली, असे तिचा भाऊ साहिल कसबे (वय २२) याने
सांगितले. दोघांचेही घर अगदी शेजारी असल्याने ही घटना अधिकच धक्कादायक ठरली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून
नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक
फौजदार सतीश कोठावळे व पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश दळवी करत आहेत. आत्महत्येचं कारण
स्पष्ट होण्यासाठी अधिक चौकशी केली जात आहे.
समाजात चिंता आणि शोककळा
या दुर्दैवी घटनेमुळे पांढरी गावात
शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि
नातेवाईकांनी या दोघांच्या अकाली जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.