पुण्यात 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण : 'ब्लड मून'चे दुर्बिणीतून दर्शन

रविवारी, ७ सप्टेंबर रोजी भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून या वेळी संपूर्ण चंद्र लालसर रंगाचा भासत असल्याने त्याला ब्लड मून असे संबोधले जाते. ज्योर्तिविज्ञान परिषदेच्या वतीने पुण्यातील केसरीवाडा वेधशाळेतून रात्री ८.३० ते मध्यरात्रीपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ग्रहणाचे दुर्बिणीद्वारे निरीक्षण, डेमो तसेच परदेशातून थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
चंद्रग्रहण
म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते व चंद्रावर पृथ्वीची
सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. पृथ्वीच्या वातावरणातून
सूर्यकिरण परावर्तित होऊन चंद्र लालसर दिसतो, यालाच खग्रास
चंद्रग्रहण म्हटले जाते.
पुण्यातील
चंद्रग्रहणाची वेळ
- ग्रहण स्पर्श : रात्री ८:५८
- ग्रहण सुरू : रात्री ११:००
- पूर्ण लाल बिंब (ब्लड मून) : रात्री ११:४२
- मोक्षकाळ सुरू : रात्री १२:२२
- पूर्ण मोक्ष : रात्री १:२६
विशेष आकर्षण
- दुर्बिणीतून चंद्र आणि ग्रह निरीक्षण
- थेट प्रक्षेपण (Live Streaming)
- जगभरातील सदस्यांकडून ग्रहणाचे अनुभव
ज्योर्तिविज्ञान परिषदेने सांगितले की, ग्रहणाची दृश्यमानता ढगांवर अवलंबून असेल. त्यामुळे
हवामान अनुकूल असल्यास पुणेकरांना "ब्लड मून" पाहण्याची संधी मिळणार
आहे.