फक्त ३ हजारात वर्षभर टोलमुक्त प्रवास! गडकरींनी केली फास्टॅग आधारित नव्या योजनेची घोषणा

नवी दिल्ली :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सोशल मीडियावरून मोठी घोषणा केली. FASTag आधारित नवीन वार्षिक पास योजना 15 ऑगस्ट 2025 पासून देशभरात लागू होणार आहे. केवळ ₹3000 मध्ये खासगी वाहनचालकांना वर्षभर किंवा 200 ट्रिपपर्यंत टोलमुक्त प्रवास करण्याची मुभा या योजनेतून मिळणार आहे.
योजनेचे महत्त्वाचे मुद्दे:
- ✅ दर:
₹3000 एकदाच
- ✅ वैधता:
सक्रियतेच्या तारखेपासून 1 वर्ष किंवा 200 ट्रिप (जे आधी घडेल)
- ✅ लागू
होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2025
- ✅ लागू
कोणासाठी: फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी
योजनेचा उद्देश काय?
गडकरी म्हणाले, "60 किलोमीटरच्या परिघात असलेल्या
टोलनाक्यांवरील जुन्या समस्यांचे निराकरण आणि वाहनधारकांचा वेळ वाचवणे हा मुख्य
हेतू आहे.
नवीन योजना ही एक परवडणारी आणि सुलभ सोल्यूशन आहे, जी टोलनाक्यांवरील वाद कमी करेल, वाहतूक सुलभ करेल
आणि लाखो खासगी वाहनधारकांना लाभ मिळवून देईल."
पास कसा मिळवायचा?
- पाससाठी
हायवे ट्रॅव्हल अॅप,
तसेच NHAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाईट्सवर लवकरच एक स्वतंत्र लिंक उपलब्ध होणार आहे.
- या
लिंकवर जाऊन पास अॅक्टिवेट करता येईल किंवा नूतनीकरण करता येईल.
अर्ज करण्यास पात्र कोण?
- फक्त
नॉन-कमर्शियल (खासगी) वाहनधारक.
- पास
मिळाल्यावर तो एका वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत
वैध असेल.
- व्यावसायिक, मालवाहतूक
किंवा व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही योजना लागू नाही