'तिमिर छेदताना' मनाला उभारी देणारे आणि निराशा दूर करणारे : आर्वे

बार्शी :- सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अस्वस्थता
आणि अस्थिरतेचा अनुभव अनेकांना येतो. अशा वेळी लेखक सचिन वायकुळे लिखित ‘तिमिर छेदताना’ हे पुस्तक मनाला उभारी देणारे आणि निराशा दूर करणारे आहे,
असे प्रतिपादन माजी सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी केले. कोल्हापूरस्थित
आविष्कार फाउंडेशनच्या वतीने येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात या पुस्तकाचे
प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी
भूषवले.
प्रेरणादायी जीवनकहाणी:
पुस्तकाचे नायक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा अनाथपणावर मात करत
आत्मविश्वासाने जगण्याचा प्रवास या पुस्तकात चित्रित केला आहे. लवटे यांची
जीवनकहाणी समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत आर्वे यांनी व्यक्त केले.
लेखकाचे मनोगत:
लेखक सचिन वायकुळे यांनी पुस्तकाच्या निर्मितीबाबत सांगताना,
“समस्यांपासून पळून जाण्यापेक्षा त्यांचा सामना करणे हेच यशाचे गमक
आहे,” असे मत व्यक्त केले.
प्रमुख उपस्थिती:
याप्रसंगी आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, जब्बार शिकलगार, प्राचार्या डॉ. सुनीता केदार,
तसेच लेखकाचे पालक निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे आणि विमल
वायकुळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी सावंत यांनी केले.