महाराष्ट्रात वाघ–मानव संघर्ष तीव्र : पाच वर्षांत २१८ नागरिकांचा बळी

भारत वाघांच्या संख्येत जगात अव्वलस्थानी असला, तरी मानव-वन्यजीव
संघर्ष वाढत असल्याने मृत्यूचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. सन २०२० ते
२०२४ या कालावधीत देशभरात ३७८ नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून,
महाराष्ट्रात तब्बल २१८ बळी गेले आहेत.
महाराष्ट्रातील स्थिती
- चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे सर्वाधिक प्रभावित
असून, मेळघाटात गेल्या
तीन वर्षांत सहा जणांचे बळी गेले आहेत.
- राज्यात सध्या ६ व्याघ्र प्रकल्प, ४८ अभयारण्ये आणि ४ संवर्धन राखीव
क्षेत्रे आहेत.
- जंगलात जागा अपुरी पडल्याने वाघ नवीन कॉरिडॉर शोधत
मानवी वस्तीजवळ पोहोचत आहेत, ज्यामुळे संघर्ष वाढत आहे.
वाघांचेही मृत्यू वाढले
महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली तरी मृत्यूची संख्याही
चिंताजनक आहे.
- मृत्यूची प्रमुख कारणे: नैसर्गिक मृत्यू, दोन वाघांमधील संघर्ष, शिकार, अपघात, विद्युतधक्का
आणि मानवी हस्तक्षेप.
आदर्श रेड्डी (क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प) यांनी सांगितले की,
"मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी
सरकारकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. वाघांना पुन्हा जंगलात सोडणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि लोकांना जागरूक करणे या प्रक्रिया नियमितपणे
सुरू आहेत."
आकडेवारी
🐅 गत
पाच वर्षांत वाघांचे मृत्यू (स्रोत : राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण)
- २०२० – १०६
- २०२१ – १२७
- २०२२ – १२१
- २०२३ – १७८
- २०२४ – १२४
- २०२५ (जानेवारी-एप्रिल) – ६२ (यापैकी महाराष्ट्रात
सर्वाधिक २०)
वाघांच्या
हल्ल्यात मानवी मृत्यू
- २०२० – ५१
- २०२१ – ५९
- २०२२ – ११० (यापैकी महाराष्ट्रात ८२)
- २०२३ – ८५