विहिरीत पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू
.jpeg)
विजयपूर : विजयपूर
जिल्ह्यातील मुद्धेबिहाळ शहरात खेळत असताना उघड्या विहिरीत पडून तीन वर्षांच्या
मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षित पाटील असे मृत मुलाचे नाव असून, तो शुक्रवारी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या बाबत कोणतीही
माहिती मिळत नव्हती. चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी हर्षितला शोधनासाठी प्रयत्न
सुरू केले होते. आज स्थानिकांनी विहिरीत उतरून पाहिल्यानंतर मुलाचा मृतदेह आढळून
आला. मुलाला उघड्या विहिरीजवळ खेळण्यासाठी
सोडले असता ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत मुद्धेबिहाळ पोलिस
ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.