मुस्तीजवळ डंपरने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

* दुचाकीवरील कामगारांचा अंत 

सोलापूर, दि.24- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ते धोत्री दरम्यान भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. देविदास दुपारगुडे (वय 40), नितीन वाघमारे (वय 35), हनुमंत राठोड (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. हे मृत व्यक्ती मुस्ती गावातील आहेत.  आज सकाळी साडे आठ वाजता हा भीषण अपघात झाला आहे. हे तिघेजण दुचाकीवरून जात असताना त्यांना एका एका अज्ञात डंपरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहन न थांबता निघून गेले आहे. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले  असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.