विजयपूर जिल्ह्यातील चडचण बँक दरोड्यात प्रकरणी बिहारच्या तिघांना, तर महाराष्ट्रातील एकास अटक

विजयपूर* :  संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या चडचण एसबीआय बँकेवर झालेल्या दरोडा प्रकरणाचा यशस्वी छडा विजयपूर पोलिसांनी लावला आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या बिहारच्या तिघांना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड महाराष्ट्रातील एक व्यक्ती असल्याचं उघड झालं आहे. मात्र, चौकशीच्या दृष्टीने पोलिसांनी त्याचं नाव अद्याप उघड केलेलं नाही. या संदर्भात स्वतः एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) हितेंद्र यांनी माहिती देताना सांगितलं की, विजयपूर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत मोठं यश मिळवलं आहे अटकेतील आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:

* राकेशकुमार शिवाजी साहनी (वय २२)

* राजकुमार रामलाल पासवान (वय २१)

* रक्षकुमार मदन माथो (वय २१)*

  हे तिघंही बिहार राज्यातील समस्तीपूरचे रहिवासी आहेत.

या बँक दरोड्यातून एकूण  ९.०१ किलो सोनं आणि ८६,३१,२२२ रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित सोनं आणि रोकड लवकरच शोधून काढण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

 

*दरोड्याचं घटनाक्रम*

 

गेल्या १६ सप्टेंबर २०२५ रोजी चडचण एसबीआय बँकेत दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात २० किलो सोनं आणि १ कोटीहून अधिक रोकड लुटून आरोपी पसार झाले होते.

पलायनासाठी त्यांनी वापरलेली मारुती ईको कार महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती गावात अपघातग्रस्त झाली. जेव्हा गावकऱ्यांनी त्या कारला घेराव घातला, तेव्हा चालकाने पिस्तूल दाखवून धमकावलं आणि कार सोडून पळून गेले

या सुरागाच्या आधारे तपास पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधून *८८८.३३ ग्रॅम सोनं असलेल्या २१ पॅकेट्स आणि ,०३,१६० रोख जप्त केली होती

तसेच, हुलजंती गावातील एका बंद घराच्या छतावर आरोपींनी टाकलेली बॅग सापडली, त्यात ६.५४ किलो सोनं आणि ४१,०३,००० रोख रक्कम मिळाली होती

   या घटनेत हुलजंती गावातील १५ जणांकडून पोलिसांनी एकूण १.५८७ किलो सोनं आणि ४४,२५,०६० रोख रक्कम देखील हस्तगत केली आहे.

 *तपास पथकाचं उत्तम कार्य*

या गुन्ह्याचा तपास *जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली व एएसपी रामनगौड हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.तपासात डीवायएसपी जगदीश एच.एस., सुनील कांबळे पोलीस अधिकारी सुरेश बेन्दे, एम.ए. डप्पिन, रमेश अवजी, राकेश बगली, श्रीकांत कांबळे, मनगूळी, एन.जी. अप्पानायकर, सोमेश गेज्जी, मंञुनाथ तिरकन्नवर, अरविंद अंगडी, देवराज उलागड्डी अधिकारी सहभागी झाले होते

एकूण ७ विशेष तपास पथकांनी प्रभावीपणे काम केल्याबद्दल एडीजीपी हितेंद्र यांनी त्यांचं कौतुक केलं आहे

या पत्रकार परिषदेत उत्तर विभागाचे आयजीपी चेतनसिंग राठोड एसपी लक्ष्मण निंबरगी आणि एएसपी रामनगौड हत्ती उपस्थित होते व  या तपासाची माहिती दिली.