श्रीनगर आणि कोट भलवाल तुरुंगात हल्ल्याचा धोका, सुरक्षा वाढवली

जम्मू | ५ मे – श्रीनगर सेंट्रल जेल आणि जम्मूतील कोट भलवाल तुरुंग येथे
संभाव्य दहशतवादी हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, तुरुंग
व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या तुरुंगांमध्ये अनेक हाय
प्रोफाइल दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू (Over Ground Workers) कैदेत
आहेत.
महत्त्वाचे अपडेट:
- गुप्तचर एजन्सींनी दिलेल्या इनपुटनंतर
तुरुंगांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
- सीआयएसएफचे महासंचालक यांनी श्रीनगरमध्ये
सुरक्षा ग्रिडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
- ऑक्टोबर २०२३ पासून जम्मू-काश्मीरमधील
तुरुंगांची सुरक्षा सीआरपीएफकडून सीआयएसएफकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
NIAची धडक चौकशी
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असून, त्या संदर्भात जम्मू तुरुंगात बंद निसार आणि मुश्ताक यांची चौकशी करण्यात आली. हे दोघे एप्रिल २०२३ पासून तुरुंगात असून, राजौरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की, या दोघांना पहलगाम हल्ल्याबाबत पूर्व माहिती होती किंवा त्यांनी हल्ल्याच्या नियोजनात भूमिका बजावली असू शकते. बहु-राज्य तपास सुरू २७ एप्रिलपासून एनआयएने औपचारिकरित्या तपास हाती घेतल्यानंतर, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये पीडित कुटुंबांचे जबाब नोंदवले जात आहेत. सुरक्षा यंत्रणांचा हेतू स्पष्ट – तुरुंगातून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या कटाचा प्रारंभिक टप्प्यावरच बंदोबस्त करणे आणि देशातील इतर भागांतील नेटवर्कचे जाळे उघड करणे हे आहे.