यंदा पहिल्यांदाच निघणार पारंपरिक वेशभूषेत महिलांची शिव शोभायात्रा, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा उपक्रम, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांची संकल्पना

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती
महामंडळाच्या वतीने यंदा होणाऱ्या महिला शिव शोभायात्रा संदर्भात शहर पोलीस
आयुक्तलय येथे बैठक पार पडली, यावेळी नानासाहेब काळे,पुरुषोत्तम बरडे, सुशील बंदपट्टे, दिलीप कोल्हे, नरेंद्र काळे, संजय शिंदे, सुनील रसाळे, महेश हनमे, सचिन स्वामी, वैभव गंगने यांच्यासह पदाधिकारी
उपस्थित होते शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रमासह
यंदाच्या वर्षी पाहिल्यादाच महिला शिव शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, यंदाच्या वर्षीचे शिवजन्मोत्सव
मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून ही
शोभायात्रा होत आहे, यंदाच्या वर्षी प्रथमच अशी शोभयात्रेचे आयोजन केल्याने
महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, महिला शिव शोभायात्रा रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी
सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून निघणार असून, ही शोभायात्रा जय मल्हार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक
मार्गे डाळींबी आड शिंदे चौक येथे येणार आहे, यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती
महामंडळाच्या मूर्तीचे पूजन महिलांच्या हस्ते होणार आहे, या महिला शिव शोभायात्रा मध्ये जास्तीत जास्त महिलांनी
पारंपारीक वेशभूषेत सहभागी व्हावे, उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिला आणि युवतींनी पारितोषिक
देण्यात येणार असून जास्तीत महिला आणि युवतींनी 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महिला
शिव शोभायात्रा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी
केले आहे