काका पुतण्याच्या भेटीने चर्चेला उधाण अजितदादा आणि शरद पवार यांच्यात खलबते

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार याच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. काका पुतण्याच्या भेटीत झालेल्या खलबत्याबद्दल तर्क वितर्क कडाळे जात आहेत. वसंतदादा शुगर इन्सटिट्यूडच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधरण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने एकाच मंचावर ते दोघे आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांची बंद दाराआड झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बीएमसी निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अजित पवारांच्या आईनेही अलीकडेच दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्याचा दावा शिवसेना (शिंदे) नेत्यांनी केला होता. या सर्व परिस्थितीत दोन्ही नेत्यांच्या या गुप्त बैठकीबाबत सगळीकडे चर्चा सुरु झाल्याचे दिसून येत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड झालेल्या बैठकीबद्दल माहिती दिली आहे. ही बैठक केवळ साखर उद्योगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झाली आहे. साखर उद्योगाशी जवळून संबंधित असलेल्या कृषी, उत्पादन शुल्क, सहकार आणि ऊर्जा विभागांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत उपस्थित होते. त्याच वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) आमदार रोहित पवार म्हणाले,”दोन्ही पक्षाचे प्रमुख चर्चेसाठी एकत्र येत आहेत, त्यांचे स्वागत करायला हवे.” असे म्हटले.